मुदखेड पंचायत समिती

पंचायत समिती, मुदखेड अंतर्गत कार्यरत विविध विभागांची संक्षिप्त माहिती 

श्री. ए.व्हि.सावंत

सहाय्यक प्रशासन अधिकारी
पंचायत समिती,मुदखेड

श्री.एस व्ही दासरवार

कनिष्ठ प्रशासन अधिकारी
पंचायत समिती,मुदखेड

श्री.व्ही.के सोनूने

कनिष्ठ प्रशासन अधिकारी
पंचायत समिती,मुदखेड

श्री.वर्गीस अब्राहम

सहाय्यक लेखा अधिकारी
पंचायत समिती,मुदखेड

सामान्य प्रशासन विभाग

पंचायत समिती मुदखेड कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागा मार्फत कार्यालयातील सर्व कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांचे दरमहा वेतन व भत्ते काढणे, रजा प्रकरणे मंजूर करणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करून त्यांना वैद्यकीय परतावा मिळवून देणे, तसेच जे अधिकारी / कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणार आहेत अशा सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना सेवा निवृत्ती वेळेवर व मुदतीत मिळावी याकरिता  कार्यवाही सुरू करून त्यांना निवृत्ती नंतर लगतच्या महिन्यापासून निवृत्ती वेतन मिळण्यासाठी कार्यवाही करणे, कुटुंब निवृत्ती वेतन व अनुकंपा प्रस्तावावर वेळीच कार्यवाही करून प्रकरणे निकाली काढणे, व इतर आस्थापना विषयक बाबी साठी अधिकारी / कर्मचारी यांना सेवा विषयक सर्व लाभ मिळवून देण्याची सामान्य प्रशासन विभाग कामकाज करते.

कार्यरत अधिकारी / कर्मचारी

अ.क्र. नाव पदनाम वर्ग ई-मेल मोबाईल विभाग
1 श्री एस.यु.देशमुख गट विकास अधिकारी 1 bdopsmudkhed1@gmail.com 9766712225 प्रमुख
2 श्री यु.एल.हातमोडे सहाय्यक गट विकास अधिकारी 2 bdopsmudkhed1@gmail.com 9850199857 सा,प्र,वि,कृषि,पशुसंवर्धन, मनरेगा
3 श्री ए. व्हि.सावंत सहाय्यक प्रशासन अधिकारी 3 bdopsmudkhed1@gmail.com 9403120089 सामान्य प्रशासन विभाग
4 श्री एस.व्ही.दासरवार कनिष्ठ प्रशासन अधिकारी 3 bdopsmudkhed1@gmail.com 9960639700 पंचायत विभाग
5 श्री व्ही.के.सोनुने कनिष्ठ प्रशासन अधिकारी 3 bdopsmudkhed1@gmail.com 9403862409 सामान्य प्रशासन विभाग
6 श्री अब्राहम वर्गीस सहाय्यक लेखाधिकारी 3 bdopsmudkhed1@gmail.com 9028817475 वित्त विभाग
7 श्री एन.सी.बंगाळे विस्तार अधिकारी (पंचायत) 3 bdopsmudkhed1@gmail.com 9422872702 पंचायत विभाग
8 श्री एस.व्ही.भाडेकर विस्तार अधिकारी (पंचायत) 3 bdopsmudkhed1@gmail.com 9421759545 पंचायत विभाग
9 श्री डी.के.उपलंचवार विस्तार अधिकारी (सांख्यिकी) 3 bdopsmudkhed1@gmail.com 9975504969 सांख्यिकी विभाग
10 श्री डि.जी.गज्जेवार कनिष्ठ लेखाधिकारी 3 bdopsmudkhed1@gmail.com 9284424041 पुर्व तपासणी शाखा
11 श्री एस.एम.पाटील विस्तार अधिकारी (कृषी) 3 bdopsmudkhed1@gmail.com 9421869771 कृषी विभाग
12 श्री ए.एम.घोडसे विस्तार अधिकारी (कृषी) 3 bdopsmudkhed1@gmail.com 7038295053 कृषी विभाग
13 श्री पी.जि.हबंर्डे विस्तार अधिकारी (आरोग्य) 3 bdopsmudkhed1@gmail.com 9284516572 आरोग्य विभाग
14 श्रीमती एस.एन.मेटकर विस्तार अधिकारी (आरोग्य) 3 bdopsmudkhed1@gmail.com 7798673813 आरोग्य विभाग
15 श्री ए.एस.दरबस्तेवार कनिष्ठ अभियंता 3 bdopsmudkhed1@gmail.com 8329558358 बांधकाम विभाग
16 श्री एस.एम.गोंडगे कनिष्ठ अभियंता 3 bdopsmudkhed1@gmail.com 7020930232 बांधकाम विभाग
17 श्रीमती जि.एन.यलकेवाड वरिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 7083987297 पंचायत शाखा
18 श्री एस.एन.हाटकर वरिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9623053958 आस्था शाखा
19 श्री व्ही.आर.सिलगमवार वरिष्ठ सहाय्यक लेखा 3 bdopsmudkhed1@gmail.com 8208525931 तपासणी शाखा
20 श्री के.के.भांगे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 7709207248 बांधकाम विभाग
21 श्री आर.ए.बोचरे अभियांत्रिकी सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9011636375 बांधकाम विभाग
22 श्री आर.आर.अंबुलगेकर कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 8857934158 पंचायत विभाग
23 श्री ए.बी.भोसले कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9527906007 भांडार शाखा
24 श्री के.जी.नागूलवार कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 8329868953 बांधकाम शाखा
25 श्री अब्दुल जावेद कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9923049878 देयक शाखा
26 श्री तौसीफ अली कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9764915629 आवक-जावक
27 श्री शेख अहमद कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 8087247235 आस्था शाखा
28 श्री आर.जी.जंपलकर कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 8149660320 मनरेगा
29 श्रीमती एस.बी.कुरुडे कनिष्ठ सहाय्यक 3 bdopsmudkhed1@gmail.com 9673575156 मनरेगा
30 श्री विदयाधर तहकिक परिचर 4 bdopsmudkhed1@gmail.com 7350917154
32 श्रीमती एम.एन.तुंगेनवार परिचर 4 bdopsmudkhed1@gmail.com 9623757781

श्री.एन. सी. बंगाळे

विस्तार अधिकारी (पंचायत)
पंचायत समिती,मुदखेड

श्री.एस.व्ही.भाडेकर

विस्तार अधिकारी (पंचायत)
पंचायत समिती,मुदखेड.

श्री.डी. के. उपलंचवार

विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
पंचायत समिती,मुदखेड.

                                                                                                      जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण

जिल्हा परिषद गटअ.क्र.ग्रा.पं.चे नावअधिकारीसंपर्कसरपंचपुरुषस्त्रीइतरएकूणकुटुंबदिव्यांग
बारड गण
बारड1बारडएस.व्ही. लाठकर9764938000प्रशासक5040489009930189980
 2नागेलीएस.एस. बिसमिले9657581046जी.व्ही. गव्हाणे6406090124921410
 3शेंबोलीपी.एस. कवठेकर9860702169प्रशासक140113390274051724
 4तिरकसवाडीएम.आर. बाचेवाड7498449941प्रशासक629575012042416
 5बोरगाव नाद्रीएस.व्ही. लाठकर9764938000प्रशासक539484010231938
 6पांढरवाडीएस.पी. भुसलवाड9665189495प्रशासक656648013042319
 7जवळा मु-हारएस.आर. नागरगोजे9561919679प्रशासक48045809381758
 8जवळा पाठकए.एस. खंदारे8459251477प्रशासक28724505321005
 9हिस्सा पाथरडएल.ई. निलपत्रेवार8600407086प्रशासक49049409841742
 10पाथरड रे.एम.व्ही. येवते8799807478प्रशासक110910510216042523
 11धनजएम.एम. शिंदे9096575847प्रशासक399393079214513
निवघा गण
बारड 1निवघाबी.एन. बुरपुल्ले9011918456प्रशासक247224430491582425
 2खांबाळापी.एल. कदम8833885889प्रशासक606607012132322
 3पिंपळकौठा मगरेएन.डी. सोनटक्के9763379700प्रशासक113610340217038910
 4मेंडकाएस.एस. देशमुख9372723088प्रशासक191518350375062651
 5ईजळीडी.डी. आढाव8469179637प्रशासक146314210288446923
 6डोंगरगावएस.एस. बिसमिले9657581046प्रशासक9539080186134728
 7पार्डी वैजापुरबी.जी. कळणे9763459063प्रशासक8488060165432217
 8राजवाडीएन.डी. सोनटक्के9763379700प्रशासक37134507161375
 9वैजापुरएम.आर. बाचेवाड7498449941प्रशासक689643013322505
 10सरेगावएम.के. मोरे9421419541प्रशासक734690014242810
माळकौठा गण
मुगट1माळकौठाएस.एस. देशमुख9372723088प्रशासक196719270389470326
 2दरेगावयु.बी. काळे7774960544प्रशासक6826560133823213
 3दरेगाव वाडीडि.के. क्षीरसागर9822982788प्रशासक599552011512238
 4महाटीएस.व्ही. रेगुलवाड9403152661प्रशासक48549209771656
 5चिलपिंपरीएस.वाय. चिलेमुड9021191836प्रशासक593585011782279
 6टाकळीजी.टी. गाढे9657022832प्रशासक35133006811443
 7खुजडाआर.डी. खोडेवाड9545367987प्रशासक5855510113620811
 8पिंपळकौठा चोरएस.एस. वाघमारे8799911327प्रशासक7656700143528510
 9रोहिपिंपळगावडि.के. क्षीरसागर9822982788प्रशासक166315990326266319
 10देवापुरएन.व्ही. चामलवार9922300670प्रशासक630646012762081
 11शंखतीर्थएन.व्ही. चामलवार9922300670प्रशासक576581011572119
 12पांगरगावएल.ई. सोगे8999390829प्रशासक831795016263169
 13रोहिपिंपळगाव तांडाएस.बी. गाडेकर9637700344प्रशासक6826370131920214
 14कामळजएस.व्ही. श्रीनेवार9922546405प्रशासक9599400189938412
मुगट गण
मुगट1मुगटव्ही.टी. कोकरे9130788211प्रशासक3377304506422109828
 2चिकाळा तांडा मोठाएस.एल. आडे8208894125रिक्त10309990202940116
 3चिकाळा तांडा लहानएस.एल. आडे8208894125रिक्त      
 4हज्जापुरव्ही.टी. कोकरे9130788211प्रशासक33133306641275
 5डोणगावएस.वाय. चिलेमुड9021191836प्रशासक148814470293562823
 6गोपाळवाडीएम.के. मोरे9421419541प्रशासक3413150656951
 7वाडी नियमतुल्लापुरएस.एस. वाघमारे8799911327प्रशासक7457700141530717
 8चिकाळाएस.डी. गिराम8275940106प्रशासक861830016913205
 9वाडी मुक्त्यारपुरएस.पी. कदम9673362987प्रशासक369330069914611
 10वाडी मुक्ताजीए.यू. कोठावळे8788514686प्रशासक523451097420518
 11आमदुराव्ही.एन. कोलपवार9370258504प्रशासक123911300236941722
 12वासरीव्ही.एन. कोलपवार9370258504प्रशासक113811000223839916
 13कोल्हाआर.डी. खोडेवाड9545367987प्रशासक495445094019213
 14वाईआर.एन. आंदेलवाड9175624377पी.बी. पेंटेवाड7797310151028914
 15वरदडा तांडाव्ही.एल. पुतळे7507576747एल.डी. पवार29324005331223

वैद्यकीय सेवा

*  प्राथमिक आरोग्य केंद्र :- ( 02 )     1) मुगट 2) रोहीपिंपळगाव

*  उपकेंद्र ( 1)       1) मुगट 2) निवघा 3) डोंगरगाव 4) बारड 5) शेंबोली 6) पिंपळकौठामगरे 

                             7) मेंडका   8) डोणगाव 9) रोहीपिंपळगाव 10) माळकौठा 11) चीकाळा  

                            12) वासरी 13) दरेगाव 14) खुजडा

*  ग्रामीण रुग्णालय (02)  ( मुदखेड, बारड)

*  प्राथमिक आरोग्य पथक (01)  चीकाळातांडा मोठा

*  युनानी दवाखाना   (01)   माळकौठा

*   वैद्यकीय अधिकारी 07

*    समुदाय वैद्यकीय अधिकारी 11

*   औषध निर्माण अधिकारी – 04

*   प्रयोगशाळा वै्ज्ञानिक अधिकारी – 02

*   आरोग्य पर्यवेक्षक – 03

*  आरोग्य सहायक -05

*  आरोग्य सहायीका -04

*  आरोग्य सेविका (ANM)  –17

*   आरोग्य सेविका (ANM) कत्राटी  –09

*   आरोग्य सेवक (MPW) 13

 

विभागीय योजना व निकष

  • योजनेचे नाव : 1. प्रधानमंत्री मातृवंदना योजना
    योजनेचे निकष / उद्देश:-  गरोदरपणात आणि बाळंतपणात महिलांना आरोग्य सेवा-सुविधा आणि प्रोत्साहनाच्या माध्यमातून कुपोषणाचा प्रभाव कमी करणे. माता व बाल आरोग्य सुधारणे.

लाभार्थी :- पहिले बाळ मुलगा किंवा मुलगी असलेली व दुसरे बाळ मुलगी असलेली महिला जी खालीलपैकी कोणत्याही एका निकषात बसत असेल अशी महिला पात्र आहे. ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाखापेक्षा कमी आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला, पात्र लाभार्थी ज्यांच्याकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन कार्ड उपलब्ध आहे, ज्या महिला अंशतः (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन) बी.पी.एल. रेशनकार्ड असलेली महिला,  प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत महिला लाभार्थी. ई-श्रम कार्ड असलेली महिला,  किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी मनरेगा जॉब कार्ड असलेली महिला. अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा सेविका

लाभाचे स्वरूपः    पहिल्या अपत्यासाठी :  पहिला हप्ता – रु.3,000/-  6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त दवाखान्यात गरोदरपणाची नोंदणी. किमान एक बाळंतपणापूर्वी तपासणी करुन घेणे आवश्यक.
दुसरा हप्ता – रु.2,000/- बालकास पेंटा – 3 पर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. (14 आठवड्यांपर्यंत) दुसऱ्या अपत्यासाठी : (मुलगी असेल तर) एक रकमी रु. 6,000/- जन्म दाखला असणे आवश्यक व बालकाचे पेंटा 3 पर्यंतचे (14 आठवडे) लसीकरण झालेले असणे आवश्यक
आवश्यक कागदपत्रेः लाभार्थीचे आधार कार्ड, गरोदरपणाचे नोंदणीचे कार्ड, बाळाचे लसीकरण कार्ड,  लाभार्थीचे आधार कार्ड जोडलेले व DBT स्नेही बँक खाते .

माहिती,अर्ज व मदतीसाठी संपर्कः आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा,  जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. अधिक माहितीसाठी 14408 या टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा.

  • योजनेचे नाव : 2. जननी सुरक्षा योजना

   योजनेचे निकष : उद्देशः-   माता व बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, महिलांचे शासकीय आरोग्य केंद्रात होणाऱ्या बाळंतपणाचे प्रमाण वाढवणे.

लाभार्थीः– अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील सर्व गर्भवती महिला

लाभाचे स्वरूपः–  बाळंतपण घरी झाल्यास 500/- रुपये. बाळंतपण शासकीय किंवा शासन मान्य मानांकीत आरोग्य केंद्रात झाल्यास , अ) शहरी भागात – रु. 600/-,ब) ग्रामीण भागात- रु. 700/-सिझर झाल्यास रु. 1500/- सदर योजनेचा लाभ बाळंत महिलेच्या बँक खात्यावर डी.बी.टी., पी.एफ.एम.एस. द्वारे देण्यात येतो.

आवश्यक कागदपत्रेः– MCP कार्ड आणि RCH नंबर, बाळंत महिलेचे बँक पासबुक

माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः   आपल्या जवळच्या आशा सेविका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी यांच्याशी संपर्क साधा. जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. 104 या हेल्पलाईनवर फोन करा.

  • योजनेचे नाव : 3. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY)
    योजनेचे निकष : उद्देशः- महाराष्ट्र सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील अंगीकृत रुग्णालयांच्या माध्यमातून विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य संरक्षण. कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थी: महाराष्ट्रातील ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे असे कुटुंब.

लाभाचे स्वरूपः वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब विमा संरक्षण, मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीच्या शस्त्रक्रियेचा समावेश, योजनेंतर्गत उपचारांसाठी सर्व लाभार्थी पात्र, शासकीय/खासगी अंगीकृत रुग्णालयात निःशुल्क लाभ घेण्याची सुविधा.

आवश्यक कागदपत्रेः – पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका, अर्जदाराचे आधार कार्ड/मतदान कार्ड/पॅन कार्ड इ.

माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः- योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त ‘आरोग्य मित्र’ हेल्पलाईन क्र.: 155388/18002332200

  • योजनेचे नाव : 4. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY)

    योजनेचे निकष : उद्देश:-भारत सरकारची प्रमुख आरोग्य विमा योजना, सरकारी आणि खासगी क्षेत्रातील रुग्णालयांच्या माध्यमातून विविध उपचारांकरिता मोफत आरोग्य विमा, कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

लाभार्थीः  सन 2011 च्या “सामाजिक, आर्थिक आणि जात आधारित जनगणनेतील” पात्र कुटुंब. अन्नसुरक्षा योजनेच्या अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंब, ही योजना केंद्र सरकार पुरस्कृत असून सदर योजनेमधील महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी राज्यात तसेच देशातील इतर राज्यात लाभ घेऊ शकतात.

  लाभाचे स्वरूपः वैद्यकीय उपचारांकरिता प्रति वर्ष / प्रति कुटुंब रु. 5,00,000/- पर्यंत

आवश्यक कागदपत्रेः वर नमूद केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्ड द्वारे केवायसी करून आयुष्मान भारत
योजनेचे कार्ड तयार करणे आवश्यक.

   माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः योजनेशी अंगीकृत रुग्णालयात नियुक्त ‘आरोग्य मित्र’ हेल्पलाईन क्र. – 14555/1800111 565

  • योजनेचे नाव : 5. निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना धर्मादाय रुग्णालयामध्ये मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार
    योजनेचे निकष : उद्देश:- धर्मादाय रुग्णालयांमध्ये निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळणे. कुटुंबातील एक व्यक्ती किंवा एकापेक्षा जास्त सदस्य एकत्रितपणे या योजनेचा लाभ घेऊ शकतात. एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा मोफत व 10 टक्के खाटा 50% सवलतीच्या दरात रुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी राखून ठेवणे.

लाभार्थी:- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पत्र 3 लाख 60 हजारांपेक्षा कमी आहे असे सर्व नागरिक.

लाभाचे स्वरूपः- ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लाख 80 हजारांपेक्षा कमी आहे, त्यांना धर्मादाय रुग्णालयांत मोफत उपचार, ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 3 लाख 60 हजारांपेक्षा कमी आहे त्यांना धर्मादाय रुग्णालयांत 50% सवलतीच्या दरात उपचार.

आवश्यक कागदपत्रेः- पिवळे रेशन कार्ड किंवा वरील रकमेचा वार्षिक उत्पन्न दाखला असणारे नागरिक, रुग्णाचे आधार कार्ड.
माहिती, अर्ज व मदतीसाठी संपर्कः- धर्मादाय रुग्णालयात नियुक्त ‘आरोग्य मित्र’ किंवा मेडिकल सोशल वर्कर.

डॉ .संजय कासराळीकर

तालुका आरोग्य अधिकारी
पंचायत समिती मुदखेड

शिक्षण विभाग

विभागीय योजना निकष

  • योजनेचे नाव : विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनानांचा तपशील

योजनेचे निकष : मोफत पाठयपुस्तक

समग्र शिक्षा अंतर्गत सर्व शासकीय, खाजगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तके देण्यात येतात. सदरची पाठयपुस्तके बालभारती पाठपुस्तक मंडळ यांच्या कडून जिल्हयाच्या UDISE+ च्या विद्यार्थी संख्येनुसार देण्यात येतात.

गणवेश
गणवेश या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील (इयत्ता 1 ली ते 8 वी) सर्व मुली, एस.सी. मुले, एस.टी. मुले व बीपीएल पालकांची मुले यांचेसाठी प्रति गणवेश संच रु. 300/- प्रमाणे 2 गणवेश संचासाठी एकूण रु. 600/- प्रमाणे प्रति विद्यार्थी निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत वर्ग केला जातो. शाळा व्यवस्थापन समिती विद्यार्थ्यांच्या मापानुसार कापड खरेदी करुन गणवेश शिलाई करुन लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात येतो.

गटसाधन केंद्र अनुदान

मुदखेड गटसाधन केंद्राला सादिल खर्चासाठी प्रती गटसाधन केंद्र रु. 27000/-, व बैठक प्रवास भत्ता यासाठी रु. 30000/-, अध्ययन-अध्यापन साहित्य अनुदान यासाठी रु. 10000/-, याप्रमाणे निधी वितरीत करण्यात येतो. तसेच गटसाधन केंद्रस्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत कार्यरत साधनव्यक्ती, विशेष तज्ञ, वरिष्ठ लेखा सहायक, डाटा एंट्री ऑपरेटर, एम.आय.एस. कोऑर्डिनेटर यांचे मासिक मानधनासाठी सदरच्या मंजूर निधीतून खर्च करण्यात येतो.

समुहसाधन केंद्र अनुदान

मुदखेड गटसाधन केंद्रातंर्गत 06 समुह साधन केंद्रांना सादील खर्चासाठी प्रती समूह साधन केंद्र रु.5,000/-, बैठक व प्रवास भत्ता रु.10,000/- प्रमाणे वितरीत करण्यात आलेले आहे.

संयुक्त शाळा अनुदान(प्राथमिक)

जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.10,000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु.25000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.50,000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.75,000/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.10,000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु.25,000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.50,000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.75,000/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.

शाळा अनुदान माध्यमिक
जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात अनुदान वितरीत करण्यात येते. विद्यार्थी संख्या 1 ते 30 साठी रक्कम रु. रु.10,000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 31 ते 100 साठी रक्कम रु. रु. 25,000/- प्रमाणे, विद्यार्थी संख्या 101 ते 250 साठी रक्कम रु. रु.50,000/- प्रमाणे व विद्यार्थी संख्या 251 ते 1000 साठी रक्कम रु. रु.75,000/- प्रमाणे शाळांना अनुदान वितरीत करण्यात येते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळांची गरज लक्षात घेऊन संयुक्त शाळा अनुदानाचा विनियोग करता येईल. ज्यामध्ये नादुरुस्त झालेल्या भौतिक सुविधा, विज्ञान प्रयोग शाळा साहित्य, शाळेचे वीज बील, इंटरनेट बील, शिक्षकांना शैक्षणिक साहित्य निर्मिती, शौचालय देखभाल दुरुस्ती. इत्यादी साठी विनियोग करता येईल.

समावेशित शिक्षण उपक्रम

1) अंशत: अंध एकूण 15 विद्यार्थ्यांना नियमित पाठयपुस्तकांप्रमाणे मोठया अक्षरातील पुस्तके वितरण करण्यात आलेले आहे. 2) तालुका व जिल्हा स्तरावर अपंग (दिव्यांग) मुलांसाठी वय 3 ते 6 व 6 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय तपासणी शिबीराचे आयोजन करणे. राष्ट्रीय आरोग्य, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत वैद्यकीय तज्ञांच्या मार्फत विद्यार्थ्यांची तपासणी करणे.3) बालकांना शाळेत ये-जा करण्यासाठी अडचणी येतात किंवा पुर्णवेळ देखभाल करावी लागते. अशा 40 बालकांना मदतनीस भत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.4) विशेष गरजा असणाऱ्या 269 बालकांना प्रवासभत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे.5) विशेष गरजा असणाऱ्या 56 विद्यार्थीर्नींना शाळेत नियमित उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन भत्ता मिळणेबाबत शिफारस करण्यात आलेली आहे. 6) सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय नवी दिल्ली व मानव संसोधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या अधिनस्त असलली स्वायत्ता संस्था अलिम्को यांच्या मार्फत जिल्हास्तरीय शिबीराचे आयोजित करुन 6 ते 18 वयोगटातील अस्थिव्यंग, बहुविकलांग, मेंदुचा पक्षघात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ट्रायसिकल, व्हिलचेअर, कुबडया, वाकर निश्चिती श्रवणयंत्र ब्रेल किट, अंध काठी, MR किट निश्चित करणेबाबत 30 लाभर्थ्याना उपलब्ध करुन देण्यासाठी शिफारस करण्यात आलेली आहे.

वाहतूक सुविधा

समग्र शिक्षा अंतर्गत रिमोट एरिया मधील विद्यार्थ्यांना येण्या-जाण्यासाठी शासनाच्या निकषानुसार वाहतूक सुविधा पुरविण्यात येते. नजीकच्या शाळेच्या क्षेत्रामध्ये किंवा हद्दीच्या आत शाळा उपलब्ध नाहीत, अशा वस्त्यांमधील 6 ते 14 वयोगटातील प्राथमिक शिक्षण देण्याच्या प्रयोजनार्थ मोफत परिवहन सुविधा किंवा अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी तरतूद आहे. इयत्ता 1ली ते 5वी च्या विद्यार्थ्यांच्या वस्थानाच्या(निवासस्थान) 1कि.मी. च्या परिसरात, इयत्ता 6वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानाच्या 3 कि.मी. च्या परिसरात शाळा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता यावे, यास्तव वाहतुक भत्ता देण्याची तरतूद आहे.

वाहतूक सुविधाबाबतचे निकष

1) गावात कोणतीही शाळा नसणे.
2) ठराविक माध्यमाची शाळा उपलब्ध नसणे.
3) गावात शाळा आहे, मात्र पाचवी / आठवीचा वर्ग उपलब्ध नाही.
4) Children from extremely deprived communities (शाळापासूनचे अंतर खुपच लांब असणे.)
5) 20 पेक्षा कमी पटाच्या शाळेचे समायोजनामुळे शाळा उपलब्ध नसणे.
6) शाळा उपलब्ध आहे मात्र मॉडेल स्कूलमध्ये जाण्याकरिता वाहतूक सुविधा (Neighbourbood School available but transportation required to go to Model School).

पाणी पुरवठा उप विभाग

विभागीय योजना व निकष

  • योजनेचे नाव – जल जीवन मिशन

योजनेचे निकष: मा. पंतप्रधान 15 ऑगस्ट 2019 रोजी देशातील प्रत्येक कुटुंबास 2024 पर्यंत ” हर घर नल से जल” उपलब्ध देण्याची घोषणा केली आहे. यासाठी केंद्रशासनाच्या निर्देशानुसार सन 2024 पर्यंत (2023-24 वर्ष) देशातील सर्व घरांना घरगुती नळ जोडणी देणे (FHTC) Functional house hold tap connection, पाणीपुरवठा करावयाचा होता परंतु त्यास 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. या करीता केंद्र शासनाने सन 2009-10 पासून सुरू असलेला, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशन मध्ये समाविष्ट करून, पुनर्रचना करण्याचे ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत ” हर घर नल से जल” (FHTC) प्रमाणे पाणीपुरवठा करण्यात निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे व यास जल जीवन मिशन हे नाव दिले आहे.

या करीता, महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्र. जजमी २०१९/प्र. क्र.१३८/पापू -१०(०७) दिनांक ०४ सप्टेंबर २०२० शासन निर्णया नुसार जल जीवन मिशन राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

उदिष्ट:- जल जीवन मिशन अंतर्गत, सन 2024 पर्यंत होती आता मुदतवाढ 2028 पर्यंत देण्यात आलेली आहे. राज्याच्या – ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणीद्वारे विहित गुणवत्तेचे ( शुद्ध, स्वच्छ व शाश्वत) पाणी प्रती व्यक्ती किमान 55 लि. प्रति दिन या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा जलजीवन मिशन चा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणीपुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे. फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणी पुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे. 20 पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतीत, प्रति व्यक्ती किमान 55 लि. प्रति दिन प्रमाणे पाणी पुरविण्यात येणार आहे.

कृषि विभाग

  • भौगोलिक क्षेत्र – 33706 हे. — सरासरी पर्जन्यमान  – 829.20 mm.
  • लागवडी लायक क्षेत्र 19 हेक्टर.
  • खरीप पिके सोयाबीन, कापूस, ज्वारी (सं). भुईमुग , रबी पिके गहू,हरभरा,ज्वारी,भुईमुग. फळबाग – केळी,उस,फुलशेती.
  • प्रमुख नद्या गोदावरी , सीता नदी.

 विभागीय योजना व निकष

१) योजनेचे नाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वालंबन योजना
   
 निकष :-

  • लाभार्थी हा अनुसूचित जातीचे असल्याचे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र असणे आवशक आहे .
  • शेतकर्याचे नावे farmer id asne aavshak aahe .
  • लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकरी यांचेकडे किमान 0.40हे.-कमाल 6.00 हे. जमीन असणे आवश्यक आहे .

निवड कार्यपद्धती : लाभार्थीनी कृषी विभागाच्या mahadbt portal द्वारे सहभागी होणे आवश्यक आहे .

२) योजनेचे नाव : बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना
     
योजनेचे निकष :

  • लाभार्थी हा अनुसूचित जमातीचे असल्याचे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र असणे आवशक आहे.
  • शेतकर्याचे नावे farmer id asne aavshak aahe .
  • लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे .
  • लाभार्थी शेतकरी यांचेकडे किमान 0.40हे.-कमाल 6.00 हे. जमीन असणे आवश्यक आहे .
  • निवड कार्यपद्धती : लाभार्थीनी कृषी विभागाच्या mahadbt portal द्वारे सहभागी होणे आवश्यक आहे .

३) योजनेचे नाव : राष्ट्रीय बायोगॉस विकास कार्यक्रम
    
योजनेचे निकष : लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे .

4) योजनेचे नाव : शेतीनिष्ठ शेतकरी ,कृषि भुषण ,कृषि रत्न ई विविध पुरस्कार मिळणे करिता शेतकर्याचे प्रस्ताव जिल्हा स्तरीय समिती मार्फत कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे कडे सादर  करणे.

योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,विविध नाविन्य पुर्ण केलेल्या कामाचे फोटो व परिपूर्ण माहिती .

५) योजनेचे नाव : जि..उपकर योजना अंतर्गत डॉ.शंकरराव चव्हाण कृशिनिष्ट पुरस्कार मिळणे  करिता शेतकर्याचे प्रस्ताव तालुका  स्तरीय समिती मार्फत कृषी विकास अधिकारी, जिल्हा  परिषद नांदेड  यांचे कडे सादर करणे.


    योजनेचे निकष : लाभार्थीचे लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,विविध नाविन्य पुर्ण केलेल्या कामाचे फोटो व परिपूर्ण माहिती .

६) योजनेचे नाव : जिल्हा परिषद उपकर योजने अंर्तगत विविध औजारे अनुदानावर पुरवठा करणे  (DBT व Cashless पद्धतीचा अवलंब करून )


   
योजनेचे निकष : – लाभार्थीचे लागणारे कागदपत्र – 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,बँक पासबुक अनु.जाती -जमाती प्रवर्गातील शेतक-यांना जात प्रमाणपत्र आवश्यक आहे .

     लाभार्थीचे लागणारे कागदपत्र :- 7/12 , 8 अ , आधार कार्ड ,विविध नाविन्य   पुर्ण  केलेल्या कामाचे फोटो व परिपूर्ण माहिती .

7) योजनेचे नाव : जिल्हा परिषद उपकर योजना अंर्तगत DBT व Cashless पद्धतीचा अवलंब करून शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी गट/महिला बचत गट यांना सूक्ष्म प्रक्रिया उद्योग करिता प्रकल्पाच्या 75 % किंवा 3.00 लक्ष्य रुपयाच्या मर्यादेत अनुदान देणे . प्रस्तावासोबत लागणारे कागदपत्र : 1) मागणी अर्ज  २)नोंदणी प्रमाणपत्र  ३)गटाचा ठराव  4)लाभ न घेतल्याचे स्वंय घोषणापत्र 5)गटाचे बँक       पासबुक 6) अध्यक्ष-सचिव यांचे आधार कार्ड  7)गटाचा PAN CARD 8)शेतकरी यांचा 7/12 आणि 8 अ.  8) प्रकल्पाचे कोटेशन  9)उद्यम आधार प्रमाणपत्र  10)fssai नोंदणी प्रमाणपत्र  11)प्रकल्प जागेचा 8अ /भाडे करार /समंतीपत्र .

श्री संदीप उत्तमराव कोस्केवार

कृषि अधिकारी (प्रभारी)
पंचायत समिती मुदखेड.

पशुसंवर्धन विभाग

पशुवैदयकीय श्रेणी – 1 दवाखाने   :-  03 ( मुदखेड,बारड,माळकौठा )

पशुवैदयकीय श्रेणी – 2 दवाखाने   :-  03 (रोहिपिंपळगांव, मुगट, निवघा )

विभागीय योजना व निकष

  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- १) दुपाळ जानावराचं गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी :- (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र  २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- २) १०-१ शेळी गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी – (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : राज्यस्तरीय नाविण्यपुर्ण योजना- ३) १००० पक्ष्यांसाठी पक्षीगृह बांधणे
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (खुला वर्ग-५०%,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी – (सर्वांसाठी)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र  २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा  ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र  ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती असल्यास)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र ९. रेशनकार्ड
  • योजनेचे नाव : विशेष घटक योजना- १) दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (फक्त ,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी – (फक्त अनु.जाती)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:- १. फोटो ओळखपत्र  २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास
    ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा
    ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र) ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र 

७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती  चे) ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र
९. रेशनकार्ड

  • योजनेचे नाव : विशेष घटक योजना- २) १०+१ शेळी गट वाटप
    योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी (फक्त ,अनु. जाती-७५%)
    योजना कोणासाठी – (फक्त अनु.जाती)
    अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
    १. फोटो ओळखपत्र  २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
    ४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा  ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
    ६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र  ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जाती चे)
    ८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र  ९. रेशनकार्ड

योजनेचे नाव : अनुसुचित जाती /जमाती उपयोजना – (ओटीएसपी योजना)

  • दोन दुधाळ जनावरांचे गट वाटप

योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी ( फक्त अनु.जमाती एसटी-७५%)
योजना कोणासाठी – (फक्त अनु.जाती)
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१. फोटो ओळखपत्र  २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास  ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र  ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जामाती चे)
८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र  ९. रेशनकार्ड

योजनेचे नाव : अनुसुचित जाती /जमाती उपयोजना – (ओटीएसपी योजना)

  • १०+१ शेळी गट वाटप

योजनेचे निकष : अनुदानाची टक्केवारी ( फक्त अनु.जमाती एसटी-७५%)
योजना कोणासाठी – (फक्त अनु.जाती)
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे:-
१. फोटो ओळखपत्र २. अपंगाचे प्रमाणपत्र असल्यास ३. दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र असल्यास
४. सद्याचा जमिनीचा ७/१२ व ८ अ उतारा ५. ग्रामपंचायतचा नमुना नं.८ (मुळ प्रमाणपत्र)
६ प्रशिक्षण असल्यास प्रमाणपत्र ७. जातीचे प्रमाणपत्राची सत्यप्रत (अनु. जामाती चे)
८. अपत्यप्रमाणपत्र / स्वयंघोषणापत्र ९. रेशनकार्ड

३) पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण:- फक्त अनु.सुचित जाती व नवबौघ्द या लाभधारकानां पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण .

डॉ प्रणिता सुरेशराव पेंडकर

पशुधन विकास अधिकारी (वि) (अतिरिक्त पदभार)

बांधकाम उप विभाग प.स.मुदखेड

विभागीय योजना व निकष

  • योजनेचे नाव : जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत खालील प्रमाणे योजनांचे नियोजन करण्यात येते

योजनेचे निकष :

अ) जिल्हा वार्षीक योजना (D.P.D.C.)
1. ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण व डांबरीकरण (3054-2179)
2. इतर जिल्हा रस्ते विकास मजबुतीकरण व डांबरीकरण ( 5054-4622)
3. ग्रामीण तिर्थक्षेत्र विकास (ग्रामीण यात्रा स्थळांचा विकास करणे )विशेष कार्यक्रम करणे (3604-0728)   

   जिल्हा परिषद स्तर व राज्यस्तर ( ब-वर्ग) ( 2515-2566)
4.पर्यटन स्थळ विकास /प्रधानमंत्री खनिजक्षेत्र विकास योजना

ब) राज्यस्तरीय योजना (S/R Program) 1.रस्ते व पुल दुरुस्ती ( लेखाशिर्ष 3054-2419) गट अ ब क ड

क) प्रशासकीय इमारतीची देखभाल व दुरुस्ती (SLR)

ड) जिल्हा परिषद उपकर /नाविण्यपुर्ण योजना / भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर योजना

1.  जि.प.अंतर्गत विविध खात्यामार्फत नियोजन करण्यात आलेली कामे खालील प्रमाणे

अ) आरोग्य विभाग:- प्राथमिक आरोग्य केंद्र/ उपकेंद्र बांधकाम व दुरुस्ती चे नियोजन करुन प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर काम पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.

ब) शिक्षण विभाग :- प्राथमिक शाळा इमारत व माध्यमिक शाळा इमारत बांधकाम व दुरुस्तीच्या कामांना प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर कामे पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.

क) पशुसंवर्धन विभाग :- पशुवैद्यकीय दवाखाना बांधकामाचे प्रशासकीय मान्यता नुसार मंजुर कामे पुर्णकरण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.

ड) महिला व बाल विकास विभाग :- अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता नुसारमंजुर कामे पुर्ण करण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.

1 .मा.लोक प्रतिनिधींनी सुचविलेली ग्रामीण भागातील मुलभूत कामे ( 2515-1238)
2. मा.खासदार मा.आमदार यांनी शिफारस केलेली कामे.
3. डोंगरी विकास कामे
4. जि.प. व पं.स. नविन इमारत बांधकाम व निवासस्थाने बांधकाम वरील सर्व कामास तांत्रिक मान्यता  देणे व निविदा प्रक्रीया राबवुन कार्यारंभ आदेश देण्याची जबाबदारी बांधकाम विभागाची आहे.

घरकुल विभाग

विभागीय योजना व निकष

  • योजनेचे नाव : 1. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण

1.योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे, दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया :- प्रपत्र ड यादी मध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते, पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी प्राप्त होणा-या उदिष्टाप्रमाणे धान्यक्रमानुसार लाभ देण्यात येतो. एकुण उद्दिष्टांपैकी 5 % घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
    3. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-, प्रथम हप्ता – 15,000/- दुसरा हप्ता – 70,000/- तिसरा हप्ता – 30,000/- अंतिम हप्ता – 5,000/-, या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
  • ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : प्रआयो-२०२५/प्र.क्र.०४/योजना-१० दिनांक ०४.०४.२०२५ या अन्‍वये  केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ (सन २०२४-२५ ते सन २०२८-२९) अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रु. ५०,०००/- इतकी अतिरिक्त वाढ करण्‍यात आली. या रु. ५००००/- रक्कमेमधून रु. ३५०००/- अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर, रु. १५०००/- इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर १ KW मर्यादेपर्यंत सौर उर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील रु. १५०००/- अनुदान देय असणार नाही.
  1. आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड – स्वच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
  2. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभे मार्फत संबधित पंचायत समिती कडे अर्ज सादर करावा.
    6. प्रधानमंत्रीआवास योजना – ग्रामीण अंतर्गत सन 2024-25 साठी मंजूर उद्दिष्ट 4167 व सन 2025-26 साठी मंजूर उद्दिष्ट 2776
  • योजनेचे नाव : 2. राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना
    1.योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा, लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे, लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे,लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे, दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया :- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते, ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केली जाते व मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते, एकुण उद्दिष्टांपैकी 5 % घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
  2. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता- 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
  • ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक : प्रआयो-२०२५/प्र.क्र.०४/योजना-१० दिनांक ०४.०४.२०२५ या अन्‍वर्य  राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत सन २०२४-२५ अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून रु. ५०,०००/- इतकी अतिरिक्त वाढ करण्‍यात आली. या रु. ५००००/- रक्कमेमधून रु. ३५०००/- अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर, रु. १५०००/- इतके अनुदान हे प्रधानमंत्री सुर्यघर योजनेतून छतावर १ KW मर्यादेपर्यंत सौर उर्जा यंत्रणा उभारणी करिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर उर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील रु. १५०००/- अनुदान देय असणार नाही.
  1. आवश्यक कागदपत्रे :- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत, Ø लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
  2. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
  • योजनेचे नाव : 3. राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना
    योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमाती संवर्गातील असावा, लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे, लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे, दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया :- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते, ग्रामसभेव्दारे पात्र

    लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या   

    कडे सादर केली जाते व मा. आयुक्त, एकात्मीक आदिवासी विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखालील  

    जिल्हास्तरीय समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते, एकुण उद्दिष्टांपैकी 5 % घरकुले अपंग    

    लाभार्थ्यांना देण्यात येतात.

  1. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता- 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
  2. आवश्यक कागदपत्रे :- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत, लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, मनरेगा जॉब कार्ड, आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
  3. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कडे अर्ज सादर करावा.
  • योजनेचे नाव : 4. राज्य पुरस्कृत मोदी आवास योजना
    योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

Ø लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे. लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वत:चे   कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया :- खालील पैकी पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी, आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु Automatic System व्दारे Reject झालेले पात्र लाभार्थी, जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी, ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कडे सादर केली जाते, ग्रामसभेव्दारे निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची पंचायत समिती व्दारे स्थळ पाहणी केली जाते, पंचायत समिती मार्फत छानणी केलेल्यांपैकी पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरी साठी पाठविण्यात येते, एकुण उद्दिष्टांपैकी 5 % घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
  2. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता-

     40,000/- अंतिम हप्ता – 20,000/- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90

     मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन  

    अनुदान देण्यात येते.

  1. आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12, सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत, मनरेगा जॉब कार्ड आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत, लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
  2. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
  • योजनेचे नाव : 5. राज्य पुरस्कृत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
    योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

Ø लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या सर्व प्रवर्गासाठी लागु आहे. सदरील योजना सामुहिकरीत्या प्रकल्पासाठी तसेच वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी लागु आहे. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी बेघर अथवा झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारा असावा/असावेत. (पुनर्वसित/ प्रकल्पग्रस्त गावठाणातील लाभार्थी कुटूंबाना सामुहिक वसाहत योजनेमध्ये घरकुलाचा लाभ देण्यासाठी भुमिहीन असल्याची अट शिथील करण्यात आली आहे मात्र इतर सामुहिक योजनेमध्ये लाभार्थी यांच्यासाठी भुमिहीन असल्याची अट कायम ठेवण्यात आलेली आहे.).लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया:- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते, ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केले जातात व मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत शासनास मंजुरी साठी प्रस्ताव सादर करण्यात येतो.
  2. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता- 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
  3. आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12, सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत, मनरेगा जॉब कार्ड आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत, लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत, लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
    लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र. लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्या बाबत 100 रुपये च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.
  4. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
  • योजनेचे नाव : 6. राज्य पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
    योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

Ø लाभार्थी कुटूंब हे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांसाठी लागु आहे. सदरील योजना वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी लागु आहे. लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा. लाभार्थी बेघर अथवा झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारा असावा. लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे. लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा. लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया:-

Ø पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते. ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केले जातात व मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत प्रशासकीय मान्यता देवुन निधी वितरणासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतो.

  1. लाभाचे स्वरुप :- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता- 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
  2. आवश्यक कागदपत्रे :- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12. सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत. मनरेगा जॉब कार्ड आधार कार्ड स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत. लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत. लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
    लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र. रहिवासी प्रमाणपत्र. लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्या बाबत 100 रुपये च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.
  3. अर्ज कुठे करावा :- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
  • योजनेचे नाव : 7. पंडित दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय योजना
    योजनेचे निकष / लाभार्थी पात्रता निकष :-

Ø केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत मंजुर असलेल्या ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे लाभार्थी. सदरील योजना वैयक्तीक लाभार्थ्यांसाठी लागु आहे.

  1. लाभार्थीची निवड प्रक्रीया:-

Ø लाभार्थ्यांने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा तालुकास्तरीय समिती मार्फत केली जाते. लाभार्थी जागा मालका बरोबर विक्री करार (Agreement To Sale) करेल. जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बॅक / पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यापुर्वी लाभार्थ्यांकडुन प्रतिज्ञापत्र प्राप्त करुन घेण्यात येते. वरील बाबींची पुर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थ्यांच्या बॅक / पोस्ट खात्यात जमा करण्यात येतो. तालुकास्तरीय समिती जागेची प्रत्येक्ष खरेदी करतांना समन्वय करते. लाभार्थ्यां मार्फत जागेची किंमत जागा मालकास अदा केली जाते व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रीया (Sale Deed) पार पडते. खरेदी नंतर लाभार्थ्यांच्या नावे सदर जागेची नोंद ग्रामपंचायत, City Survey व इतर सक्षम प्राधीकरणाकडे तालुकास्तरीय समिती मार्फत केली जाते. जागेची नोंद प्राधान्याने लाभ धारकाच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येते. जागा खरेदीची प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोनार्थ ठेवण्यात येते.

  1. लाभाचे स्वरुप :- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटूंबाना 25 चौ.मी. (500 चौ.फुटा पर्यंत) जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000/- हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते.
  2. आवश्यक कागदपत्रे :- घरकुल बांधण्यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नसल्या बाबतचे प्रमाणपत्र व शपथपत्र. लाभार्थ्याचा जागा मालका बरोबर विक्री करार (Agreement To Sale).
  3. अर्ज कुठे करावा :- ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत काम मागणाऱ्या लाभार्थ्यांना अकुशल रोजगार पुरविला जातो. यामध्ये १०० दिवसांपर्यत रोजगाराची हमी केंद्र सरकारची आहे व त्यानंतरची रोजगाराची हमी राज्य सरकार देते. योजनेचे संपूर्ण कामकाज हे संगणकीकृत असून लाभार्थी यांच्या बँक खात्यात त्यांच्या मजुरीची रक्कम जमा होते. हे सर्व कामकाज पारदर्शक पद्धतीने केले जाते. या योजनेंतर्गत सार्वजनिक तसेच वैयक्तिक कामे देखील घेता येतात. बेरोजगारांना रोजगार निर्माण करून देण्याबरोबरच शाश्वत मत्ता निर्माण करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

जॉबकार्ड (Job card) काढण्यासाठी पात्रता
1. ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.  2. वय वर्ष १८ पासून पुढे असावा. 3. अंगमेहनतीचे काम करण्याची तयारी असावी.  सदरची माहिती ग्रामपंचायत मार्फत NREGA वेबसाईट भरली जाते व संबंधित मजूर हा NREGA साठी पात्र ठरतो. त्याला छोटी पुस्तिका ग्रामपंचायत मार्फत देण्यात येते त्यालाच job card म्हणतात.

जॉबकार्ड काढण्याची पद्धत
संबंधित मजुराने खालील कागदपत्रे त्याच्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक किंवा ग्रामरोजगार सेवक यांच्याकडे द्यावी.
1. कुटुंब नोंदणीसाठी करावयाचा अर्ज नमुना नंबर १ (ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध आहे)
2. गावातील रहिवाशी असल्याचा पुरावा (रेशनकार्ड zerox, आधारकार्ड zerox,      इतर कोणताही पुरावा)
3. बँक पासबुक zerox  4. कुटुंबाचा एकत्रित ४*६ चे ३ फोटो

काम मागणीची पद्धत
1. काम मागणीचा अर्ज नमुना क्र. ४ भरून देणे.  2. जॉबकार्ड details. काम मागणी केल्यानंतर १५ दिवसात काम दिले जाते. जर १५ दिवसांत काम दिले गेले नाही तर बेरोजगार भत्ता देण्यात येतो.

NREGA अंतर्गत घेता येणारी वैयक्तिक कामे मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
1. विहित नमुन्यात अर्ज  2. जॉबकार्ड details 3. संबंधित कामासाठी लागणारी सर्व कागदपत्रे 4. ग्रामसभेची मान्यता.
   जी कामे घेण्याची आहे ती ज्या शासकीय यंत्रणेच्या कार्यक्षेत्रात येतात त्यांच्याकडे ग्रामपंचायत मार्फत अंदाजपत्रक,     

   तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मंजुरी करिता पाठविली जातात. त्यानंतर संबधित यंत्रणांकडून सर्व मंजुरी होऊन कार्यारंभ   

   आदेश दिला जातो. हि सर्व माहिती NREGA वेबसाईट update करून कामांचे E-musters काढले जातात.

मजुरी अदा करण्याची पद्धत

संबंधित मजुराने जॉबकार्ड काढताना किंवा E-musters काढताना जे बँक पासबुक zerox दिलेले असेल त्यात किंवा आधार लिंक केलेला असल्यास आधार बेस पेमेंट द्वारे बँक मध्ये E-musters चा कालावधी संपल्यावर ८ दिवसात मजुरी थेट खात्यात जमा होईल. वैयक्तिक कामांबाबत कुशलचे पेमेंट (उदा. फळबाग लागवड मध्ये रोपे खरेदी, पिशव्या खरेदी, खते ई. साहित्य) हे देखील थेट त्याच खात्यात जमा होते. सार्वजनिक कामांचे कुशलचे पेमेंट हे संबंधित यंत्रणेच्या खात्यात जमा होऊन नंतर संबंधिताना देण्यात येते. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मनरेगा ची मजुरी रक्कम रु. 312 /- प्रतिदिन आहे.

अनुज्ञेय कामे –
मनरेगा अंतर्गत घेता येणाऱ्या २६२ कामांपैकी भौगोलिक परिस्तिथी लक्षात घेता खालील कामे प्रामुख्याने घेता येऊ शकतात. 

 वैयक्तिक स्वरुपाची कामे –
1. प्रधानमंत्री आवास योजना/इंदिरा आवास योजना अंतर्गत घरकुलचे अकुशल काम  2. फळबाग लागवड
3. वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.) 4. सिंचन विहीर 5. शेततळे
6. शोषखड्डे 7. कंपोस्ट खत/नाडेफ खत/गांडूळ खत टाकी 8. अझोला खत/ जैविक खत निर्मित साचा
9. गुरांचा/ शेळीचा गोठा 10. कुक्कुटपालन शेड  11. शेत बांध बंदिस्ती

सार्वजनिक स्वरुपाची कामे –
1. सार्वजनिक फळबाग लागवड  2. सार्वजनिक वृक्षलागवड (पडीक जमिनीवर /रस्ता दुतर्फा /किनारपट्टी लगत /बांधावर इ.)  3. रोपवाटिका  4. सार्वजनिक सिंचन विहीर  5. शेततळे  6. CCT  7. सार्वजनिक कालवा/ तळे/ लहान पाझर तलाव/ मत्सपालन तलाव बांधणे, दुरुस्ती व नूतनीकरण  8. गुरांचा/ शेळीचा गोठा /कुक्कुटपालन शेड
9. रस्ते.

अभिसरण अंतर्गत घेता येणारी कामे –
राज्य अभिसरण आराखड्यामध्ये अकुशल भाग हा रोजगार हमी योजना मधून व कुशल भाग इतर योजना मधून दिला जातो. यामध्ये एकूण २८ कामांपैकी जिल्ह्यामध्ये घेता येऊ शकणारी कामे खालीलप्रमाणे आहेत. 

  1. शाळेसाठी संरक्षण भिंत बांधकाम 2. शाळेकरिता/मैदानाकरिता साखळी कुंपण  3. शालेय स्वयंपाकगृह निवारा
    4. अंगणवाडी बांधकाम 5. ग्रामपंचायत भवन 6. सार्वजनिक जागेवर गोदाम 7. स्मशानभूमी शेड बांधकाम
    8. बचत गटांच्या जनावरांसाठी सामुहिक गोठे  9. छतासह बाजार ओटा/ मासे सुकवण्यासाठी व विक्रीसाठी ओटा
    10. सामुहिक मत्स्यतळे 11. सिमेंट रस्ता 12. डांबर रस्ता 13. पेव्हिंग block रस्ता 14. नाला मोरी बांधकाम
    15. सिमेंट नाला बांध 16. RCC मुख्य निचरा प्रणाली 17. भूमिगत बंधारा

फळबाग लागवड करिता प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )  2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)
3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत  4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)
5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल. 6. आधारकार्ड झेरॉक्स. 7. ७/१२ व ८ अ
8. क्षेत्र २ हे. पेक्षा कामे असावे व त्याच क्षेत्रावर यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 9. ७/१२ वर सह-हिस्सेदार असल्यास त्यांचे समंतीपत्र व स्वतःच्या क्षेत्रात लागवड करीत असल्याचे क्षत्रीपुर्ती बंधपत.

ककुक्कुटपालन शेड (निवारा) बांधण्याकरिता प्रस्तावाची चेक लिस्ट

  1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे ) 2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल. 6. आधारकार्ड झेरॉक्स.  7. कोंबड्या नसल्यास बांधकाम झाल्यानंतर १ महिन्यात कोंबड्या घेण्याचा करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर). 8. कुक्कुटपालन शेडचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार  9. असल्यास त्यांचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)
    10. (कुक्कुटपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास ) 11. जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास सर्व हिस्सेदारांचे 12. मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर ) आवश्यक.
    13. हमीपत्र, मागणी पत्र 14. 100 पक्षी (कोबडया) असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला.

जनावरांसाठी गोठा करिता प्रस्तावाची चेक लिस्ट

  1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे ) 2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल. 6. आधारकार्ड झेरॉक्स  7. करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.स्टॅम्पवर)  8. गोठयाचा असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार 9. असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर) 10. (गोठयाचा असेसमेंट उतारा नसल्यास ) 11. जागेचा 7/12 उतारा व 8अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास 12. सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर ) आवश्यक. 13. हमीपत्र, मागणी पत्र 14. दुसऱ्या लाभासाठी १२ जनावरे व तिसऱ्या लाभासाठी १८ जनावरे असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला

शेळीपालन शेड बांधण्याकरिता प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )  2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे  3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 5. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल.  6. आधारकार्ड झेरॉक्स . 7. करारनामा (प्रतिज्ञापत्र) (100रु.बाँडपेपरवर). 8. शेळीपालन शेड असेटमेंट उतारा, मात्र सदर असेसमेंट उताऱ्यावर अन्य हिस्सेदार 9. असल्यास त्याचे संमत्तीपत्र मा.तहसिलदारसाहेब समोर (100 रु.बाँडपेपरवर)    10. (शेळीपालन शेडचा असेसमेंट उतारा नसल्यास ) 11. जागेचा 7/12 उतारा व 8 अ , मात्र 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास 12. सर्व हिस्सेदारांचे मा.तहसिलदार यांचे समोर संमत्तीपत्र ( 100 रु.बाँडपेपरवर )आवश्यक. 13. हमीपत्र, मागणी पत्र 14. दुसऱ्या लाभासाठी २० शेळ्या व तिसऱ्या लाभासाठी ३० शेळ्या असल्याबाबतचा पशुधन विभागाचा दाखला

मगांराग्रारोहयो- महाराष्ट्र अतर्गत सिंचन विहिरीसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. लाभाथ्याचे जॉबकार्ड आवश्यक. 2. ग्रामसभेचा ठराव आवश्यक 3. किमान 0.60 गुठे सलग क्षेत्र आवश्यक ,सदर क्षेत्राचा 7/12 उतारा व 8 अ आवश्यक.4. प्रस्तावित विहिरीपासुन 500 फुटाच्या आत दुसरी विहिर नसलेबाबतचा तलाठी /ग्रामसेवक यांचा दाखला 5. 7/12 उताऱ्यात अन्य हिस्सेदार असल्यास मा. तहसिलदार साहेब यांच्या समोर सर्व हिस्सेदारांचे संमत्तीपत्र आवश्यक किंवा समूह सिंचन विहिर प्रस्ताव प्रकरण करावयाचे असल्यास 7/12 उतारामधील सर्व हिस्सेदारांचे मा. तहसिलदार साहेब यांचे समोर संमत्तीपत्र (100 रु.बाँडपेपरवर ) व सर्वांचे पाणी वाटप करारपत्र मा.सरपंच यांचे समोर आवश्यक (100 रु बाँडपेपरवर) . 6. प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध असलेबाबतचा भुजल सर्वेक्षण विभागाचा दाखला आवश्यक.( प्रस्ताव सादर केल्यानंतर सदर दाखल्याची मागणी पं.स.मार्फत केली जाईल.)

शेाषखड्डा खोदणे व बांधण्याकरिता आवश्यक कागदपत्रे (चेक लिस्ट)

  1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे ) 2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 4. लाभार्थ्याच्या घरपत्रकाचा उतारा.(जर लाभार्थीचे नाव घरपत्रकावर नसल्यास संबधितांकडुन मा.सरपंच याचंे समोर साधे संमत्तीपत्र ) 5. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 6. बँक पासबुक / पोस्ट बुक खाते तपशिल. 7. ओळखपत्र / रेशनकार्ड / आधारकार्ड झेरॉक्स .

(नॅडेप खत निमिर्ती / गांडुळखत निमिर्ती / अमृतपाणी संजीवक तयार करणे या करिता आवश्यक कागदपत्रे)
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )  2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत  4. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा)  5. ज्या जागेत गांडुळ खत /नॅडेप खत तयार करावयाचे आहे त्या जागेचा 7/12 उतारा  6. नोव्हेंबर 2005 नंतर तिसरे अपत्य नसल्याबाबत व कुटंब मर्यादीत असलेबाबतचा 7. ग्रामसेवक/सरपंच यांचा दाखला. 8. जागा पुरेशी असलेबाबत ग्रामसेवक यांचा दाखला.
9. बँक पासबुक/पोस्टबुक खाते तपशिल. 10. आधारकार्ड झेरॉक्स.

रस्ता तयार करणे प्रस्तावाची चेक लिस्ट

  1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे ) 2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव 4. नमुना नंबर २६

गाळ काढणे (वैयक्तिक विहिरीतील) प्रस्तावाची चेक लिस्ट
1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे )  2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे)  3. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 4. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 5. ७/१२ (विहिरीची नोंद आवश्यक)
6. मागील ३ वर्षात गाळ न काढल्याचा दाखला

गाळ काढणे (सार्वजनिक विहिरीतील) प्रस्तावाची चेक लिस्ट

  1. विहित नमुन्यात अर्ज .(गटविकास यांच्या नावे ) 2. मागणी पत्र (ग्रामसेवक /सरपंचाच्या नावे) 3. जॉबकार्ड असलेबाबतचा दाखला (ग्रामसेवकांचा) 4. ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव प्रत 5. मागील ३ वर्षात गाळ न काढल्याचा दाखला

महिला व बाल कल्याण विभाग

पदांची स्थिती

  1. प्रकल्प कार्यालय :- मंजूर पदे: 7

 

  • अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका :- मंजूर पदे: 110
  • अंगणवाडी मदतनीस  :- मंजूर पदे: 110

विभागाच्या योजना

  • योजनेचे नाव : पुरक पोषण आहार

योजनेचे निकष : 6 महिने ते 3 वर्ष बालकांना आहार पुरवठाबाबत माहिती.
➤ Take Home Ration (THR) आहार मिळणा-या लाभार्थ्यांची संख्या
     6 महिने ते 3 वर्ष बालके- 2679
     गरोदर व स्तनदा माता- 758
     तिव्र कमी वजनाचे लाभार्थी- 42
    3 वर्ष ते 6 वर्ष बालकांना आहार पुरवठाबाबत माहिती.
    बचत गटांमार्फत आहार पुरवठा व अंगणवाडी कार्यकर्ती / मदतनिस मार्फत होणा-या      

    अंगणवाड्यांची संख्या – 08
     महाराष्ट स्टेट कोऑपरेटीव्ह कन्झुमर्स मार्फत आहार पुरवठा होणा-या अंगणवाडयांची                                     

      संख्या – 102

  • योजनेचे नाव : लेक लाडकी योजना

योजनेचे उद्दिष्ट: लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकारची एक योजना आहे, जी मुलींच्या जन्मानंतर त्यांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली आहे. मुलींचा जन्मदर वाढवणे आणि त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.

लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण प्राप्त झालेले प्रस्ताव – 265
पोर्टलवर भरण्यात आलेले प्रस्ताव- 265
लाभ प्राप्त झालेले एकूण लाभार्थी संख्या- 175
मा. जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्या स्तरावर पेंडिंग असलेले अर्ज संख्या- 78
शिल्लक लाभार्थी संख्या – 12

  • योजनेचे नाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :

योजनेचे उद्दिष्ट- राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना

रु. 1,500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येतो.

  • प्रधानमंत्री मातृ वंदना / Pradhanmantri Matru Vandana Yojana (PMMVY)

योजनेचे उद्दिष्ट- प्रधानमंत्री मातृ वंदना योजना (PMMVY)  ही एक मातृत्व लाभ योजना आहे जी गरोदर आणि स्तनदा मातांना त्यांच्या पहिल्या जन्मासाठी/दुस-या मुलीच्या जन्मासाठी रु. 6000/- रुपयांची आर्थिक मदत पुरवते. मजुरीच्या तोट्याची भरपाई करणे आणि स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

 

एकूण लाभार्थी संख्या – 1325

लाभ मिळालेले लाभार्थी संख्या – 279

शिल्लक लाभार्थी संख्या- 403

Reject झालेले अर्ज – 429

श्री. सुमेध पांडुरंग ससाणे

एकात्मिक बाल विकास सेवा योजना
पंचायत समिती मुदखेड

राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियान

सन २०११ मध्ये केंद्र शासनाने ग्रामीण भागातील गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोनती अभियानाची सुरुवात केली. उमेद अभियानाचा मुख्य उद्देश गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढणे हा आहे. हे महत्त्वाकांक्षी ध्येय विविध घटकाद्वारे साध्य केले जाते. ज्यामध्ये समुदाय संघटन स्थापन करून गरिबांनी, गरिबांसाठी निर्माण केलेल्या मजबूत समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती करणे असा आहे. ग्रामीण गरीब महिलांना अभियानामार्फत आणि विविध वित्तीय संस्था व बँकांच्या मदतीने शाश्वत उपजीविकेचे स्रोत उभे करण्यासाठी वेळेवर, किफायतशीर व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा करण्यात येत आहे. उमेद अभियानाने दारिद्र्य निर्मूलनाचा एक समग्र विचार केला आहे, ज्यात समुदाय विकासापासून ते शाश्वत उपजीविका निर्माण करण्यापर्यंतच्या सर्व बाबींचा समावेश आहे यामध्ये सामाजिक समावेशन अंतर्गत प्रत्येकाला स्थान आणि आवाज मिळणे सुनिश्चित करणे, आर्थिक समावेशन अंतर्गत आर्थिक सहभागासाठी संधी निर्माण करणे, वित्तीय समावेशन अंतर्गत आवश्यक वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे अशा बाबींचा समावेश आहे.

समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करण्यासाठी सर्व स्तरावर प्रशिक्षण देण्यासारखे उपक्रम राबविले जात आहेत. सहभागी महिलांना आर्थिक साक्षर करणे, बचतीच्या सवयीतून आर्थिक शिस्त येणे, उद्योजकतेचा विकास होऊन उद्यमी होण्याचा मार्ग सुकर करणे यासारख्या बाबींचा समावेश करून क्षमता विकसित करण्याचे काम अभियानांतर्गत नियमित सुरु आहे.

 ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांची विक्री करता यावी आणि त्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी या करिता उमेद अभियानच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय भव्य दिव्य असे महालक्ष्मी सरस – भव्य प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले जाते. तसेच विभागीय स्तरावर आणि जिल्हा स्तरावर सुद्धा तत्सम प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची आणि शास्वत बाजारपेठ मिळावी यासाठी अभियानाने umedmart.com हा ई कॉमर्स सेवा सुरु केलेली आहे.

अभियानाचा उद्देश व ध्येय:- 

गरीब व जोखीमप्रवण कुंटूंबाचा अभियानात समावेश करणे

सर्वसमावेशक व लोकशाही तत्वावर गरीबांच्या संस्थाची उभारणी करुन त्यांची क्षमता बांधणी करणे

वित्तीय सेवा व शासकीय लाभ मिळवून देणे

सामाजिक सुरक्षा निर्माण करणे

शाश्वत उपजीविका निर्माण करणे

कृतीसंगमाच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजनांचा लाभ देणे

गरीबांच्या आयुष्यात समृध्दी निर्माण करणे

सामाजिक समावेशन व संस्था बांधणी

 ग्रामीण गरीब कुटुंबांची गरिबी दूर करण्यासाठी वैविध्यपूर्ण व फायदेशीर शेती/ बिगरशेती क्षेत्रातील उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देणे व रोजगार आणि वेतनासाठी संधी उपलब्ध करून देणे यासाठी गरिबी निर्मूलनाचे विविध उपक्रम राबविणे हे उमेद अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट आहे. याकरिता राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियामानाध्ये ग्रामीण गरीब कुटुंबातील महिलांना संघटीत / एकत्रित करून त्यांची रचनात्मक संस्थीय बांधणी करण्यात येतआहे.

सामाजिक समावेशन

गरीब कुटुंबाना एकत्रित व संघटीत करून त्यांच्या स्वत:च्या स्वयंचलित संस्था निर्माण करणे हा ‘उमेद’ अभियानाचा मुख्य हेतू आहे.या संस्थाच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलाना संघटीत करून शाश्वत रोजगार/उपजीविका (शेती, शेती पूरक व बिगर शेती इ.ठिकाणी रोजगार) उपलब्ध होण्याकरिता प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक गरीबातील गरीब कुटुंबातील किमान एक महिला संस्थीय रचनेमध्ये (स्वयंसहाय्यता गट,ग्रामसंघ व प्रभागसंघाला) जोडण्यात येते स्वयंसहायता समूह स्थापनेनंतर गाव / ग्रामपंचायतस्तरावर ग्रामसंघ व प्रभाग स्तरावर प्रभागसंघ अशा पद्धतीने ग्रामीण गरीब कुटुंबांची त्रिस्तरीय संस्थीय बांधणी करण्यात येत आहे.

सहभागीदार

गावपातळीवरील संस्थाची स्थापना व उमेद अंतर्गत सर्व उपक्रम अंमलबजावणी करताना समुदायस्तरीय संस्था सर्व ग्रामीण गरीब कुटुंबांचा सहभाग घेतील. ग्रामीण गरीब कुटुंबांच्या सर्वागीण विकास प्रक्रियेमध्ये सर्व सहभागीदार यंत्रणा (ग्रामपंचायत, आरोग्य , शिक्षण असे व अन्य सर्व शासकिय निमशासकीय विभाग व यंत्रणा), सामाजिक संस्था इ. चा सक्रिय सहभाग अपेक्षित आहे. कार्यरत त्रिस्तरीय समुदाय संस्थांमध्ये खालील मुल्यांचा समावेश असेल.

पारदर्शकता

संस्था, गट व अभियानामार्फत निर्देशित कार्यक्रम/उपक्रमांची अंमलबजावणी करतानापारदर्शकता ठेवणे अपेक्षित असते.

  • संस्थेची स्थापना झाल्यावर संस्थेची सर्व मुलभूत माहिती DAY – NRLM Portal वर नोंदविण्यात येते.
  • संस्थेची माहिती संबंधित शासकीय विभाग, बँका, नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यकतेनुसार देण्यात येते.
  • अंतर्गत व बाह्य लेखापरीक्षणाची माहिती , प्रगती अहवाल प्रभागसंघ संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व सदस्यांना दिली जाते.

संवेदनशीलता

  • संस्थेद्वारे आजपर्यत दुर्लक्षित , वंचित , बेघर , भूमीहीन , विधवा , परितक्त्या , दिव्यांग , आदिवासी , आदिम जमाती ( PVTG ) , दुर्धर आजाराने पिडीत , वृद्ध कुटुंबांचा / घटकांचा शोध घेऊन त्यांना सहाय्य केले जाते.
  • अभियानाचा निधी, बाह्य संस्थांद्वारे प्राप्त होणारा निधी प्राधान्याने लक्षघटकाला उपलब्ध करून देण्यात येतो.

उमेद अंतर्गत कार्यरत समुदायस्तरीय संस्थां खालीलप्रमाणे आहेत :-

१. स्वयंसहाय्यता समूह ( SHG ) :-

कुटुंबांचे दारिद्र्य दूर करून सन्मानाचे जीवन जगण्याच्या उद्देशाने एकाच गावामध्ये राहणरी आणि समान सामाजिक, आर्थिक परिस्थितीत असणारी १० ते १५ गरीब कुटुंबेमहिला एकत्र येवून दशसुत्री नियमावलीच्या आधारे समूह तयार करतात त्यास स्वयंसहाय्यता समूह असे म्हणतात.

गावात गट तयार करताना प्राधान्याने सुरुवात ही गरीब, वंचित घटकांपासून म्हणजेच अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक, विधवा,परित्यक्त्या, एकल, दिव्यांग, तृतीयपंथी, दिव्यांग कुटुंबातील महिला या पासून केली जाते. स्व-विकास/सक्षमीकरणकरताना गटातील सर्व महिलांच्या सर्वांगीण (कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय) विकासाच्या हेतूने प्रेरित महिला एकत्र येऊन समूह स्थापन करतात.

1.स्वयंसहाय्यता समूहाचे कार्यक्षेत्र :

एका ग्रामपंचायती अंतर्गत येणारे गाव, वाडी, वस्ती, पाडा, टोला, तांडा, मळा, मोहल्ला, गल्ली हे समूहाचे कार्यक्षेत्र असेल. या कार्यक्षेत्रातील १०-१५ कुटुंबांचा एका स्वयं सहाय्यता समूहातसमावेश केला जातो. दिव्यांग,तृतीयपंथी,वयोवृद्ध कुटुंबांना मिश्र गटाच्या माध्यमातून अभियानाशी जोडण्यात येतात. हे गट ५ ते ७ सदस्यांचे मिश्र गट असतात दशसुत्री स्वयंसहाय्यता गटांसाठी नियमावली म्हणून द्शसुत्रीचे नियम करण्यात आलेले आहेत.

२. ग्रामसंघ ( VO )

गाव पातळीवरील सर्व गटांच्या समस्या सोडविण्यासाठी एखादा गट पुरेसा ठरत नाही. परिणामी सर्वांनी मिळून संघटीतरित्या समस्या सोडविण्यासाठी व्यापक सामुहिक संघटनेची गरज असल्याने तेथे सर्व महिला स्वयंसहाय्यता गटांच्या सहभागातून गाव/ग्रामपंचायतपातळीवर ग्रामसंघाची (Village Organisation- VO) स्थापना करण्यात येते .याकरिता ग्रामपंचायत हे कार्यक्षेत्र असते. १५० ते २०० महि ला एकत्र आल्यानंतर त्यावर शासकीय/निम शासकीय यंत्रणाना संबधित समस्येचे समाधान करणे सोपे जाते.

ग्रामसंघाचे कार्यक्षेत्र

                       ग्रामसंघ स्थापन होताना किमान ६ गटांची आवश्यकता असते. एका ग्रामसंघात कमीतकमी सहा आणि जास्तीत जास्त २५  ते ३० गट असतात. जर गाव खूप लहान असेल आणि ग्रामसंघ स्थापन करताना पाच गट नसतील तर शेजारील गावातील पात्र असणाऱ्या गटांचाही समावेश करून ग्रामसंघ तयार करता येऊ शकतो.ग्रामपंचायत व ग्रामपंचायतीमधील महसुली गाव हे ग्रामसंघाचे कार्यक्षेत्र असेल.

३. प्रभागसंघ ( CLF )

एका प्रभागाने गरिबी निर्मूलनाच्या कार्यकक्षेत समावेशन करून त्यासाठी योग्य प्रयत्न व उपयोजना करणे अपेक्षित आहे. अशा प्रकारेच तालुका व जिल्हा स्तरावर गरिबी मुक्ती साध्य होऊ शकते.

ही कामे व्यापक स्वरूपात पाहता ग्रामसंघामधील गटांची सदस्यसंख्या, त्यांचे कार्यक्षेत्र आणि सदस्यसंख्या यांना काही मर्यादा असल्याचे दिसून येते. यासाठी एका प्रभागातील सर्व ग्रामसंघांच्या सहभागातून प्रभागसंघ या शिखर संस्थेची स्थापना करण्यात येते.

अभियानांतर्गत विविध स्तरांवर विविध योजना व कार्यक्रमांचे आयोजन तसेच कृतीसंगम करण्यात येत आहे. प्राधान्याने खालील बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येते:

  • गटांना विमा सुविधा उपलब्ध करून देणे
  • Farmers Producer Organisations (FPOs) स्थापन करणे
  • शेती व बिगर शेती आधारित उद्योग निर्माण करणे
  • विविध शासकीय योजना राबविणे, जसे:
    • MGNREGS
    • दिव्यांगांसाठी योजना
    • महिला व बाल विकास योजना
    • पोषणविषयक योजना

प्रभागसंघ ही संस्था या सर्व योजना व सेवांना प्रभाग पातळीवर एकत्रित करून आवश्यक समन्वय साधते. तसेच सर्व योजनांचा प्रचार व प्रसार करून प्रत्येक गरजू सदस्य व कुटुंबाला या योजनांशी जोडण्याचा प्रयत्न करते.

यामुळे सर्व योजना व सेवा प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतात.

प्रभागसंघाचे कार्यक्षेत्र साधारणतः २० ते २५ गावे असून त्या क्षेत्रातील सर्व ग्रामसंघ हे प्रभागसंघाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट असतात.

१) एका प्रभागातील सर्व ग्रामसंघाना प्रभागपातळीवर एकत्रित करून प्रभागसंघ निर्माण करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून प्रभागस्तरावर विविध कामांचे व्यवस्थापन व विकास सामुहिक संघटनात्मकरित्या करता येतो.

२) प्रभागसंघ ग्रामसंघाना मार्गदर्शक, त्यांचे सनियंत्रण व क्षमता बांधणी करण्याच्या भूमिकेत काम करतो ३) विविध शासकीय तथा निमशासकीय संस्था, खाजगी संस्था तसेच Producer Group च्या माध्यमाने राबविण्यात येणाऱ्या उपजीविकांच्या योजनांकरिता प्रभागस्तरावर एकत्रित करण्याचा व समन्वय करण्याचा प्रयत्न केला जातो. ज्यामुळे अधिकाधिक गरजू महिला/कुटुंबाना शाश्वत उपजीविकेकडे नेता येते.

आर्थिक समावेशन

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान सन २०११ पासून कार्यरत आहे. सदर अभियानाचा उद्देश स्वयंसहाय्यता समूहाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा उपजीविका विकास करणे हा आहे. सध्यस्थितीत 905 स्वयंसहाय्यता समूहाची स्थापना करण्यात आलेली आहे. या समूहांना आर्थिक सहाय्य प्राप्त व्हावे याकरिता आर्थिक समावेशन विभागांतर्गत खालीलप्रमाणे विविध उपक्रम राबविले जातात.

फिरता निधी

स्वयंसहाय्यता समूहांना स्थापना होऊन ३ महिने पूर्ण झाल्यानंतर समूहांना अंतर्गत कर्ज व्यवहाराला अर्थसहाय्य म्हणून रु. 15,००० चा फिरता निधी अदा करण्यात येतो.

समुदाय गुंतवणूक निधी

स्वयंसहाय्यता समूहांना उपजीविका विकासाकरिता समूह स्थापन होऊन ६ महिने पूर्ण झाल्यानंतर सदर समूहांचा सूक्ष्म गुंतवणूक आराखडा तयार करण्यात येतो. सूक्ष्म गुंतवणूक आराखड्यानुसार सदर समूहांना रु. ६०,००० चा समुदाय गुंतवणूक निधी खालील प्रणालीद्वारे अदा करण्यात येतो. ज्या स्वयंसहाय्यता समूहांनी रु. ६०,००० च्या समुदाय गुंतवणूक निधीची नियमित परतफेड केली असेल असे समूह दुबार समुदाय गुंतवणूक निधीकरिता पात्र असतात. दुबार समुदाय गुंतवणूक निधी कमाल रु ३.०० लक्षापर्यंत अदा करण्यात येतो.

बँक पतपुरवठा

स्वयंसहाय्यता समूहाचे राष्ट्रीयकृत, खाजगी, प्रादेशिक ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये बँक खाते उघडण्यात येते. सदर समूहांना स्थापना होऊन ६ महिने पूर्ण झाल्यानंतर कृषी, कृषी आधारित अथवा बिगर कृषी स्वरूपाच्या उद्योग व्यवसायाकरिता रिजर्व बँक ऑफ इंडियाच्या नियमावलीनुसार बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. स्वयंसहाय्यता समूहांना विहित वेळेत बँक कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता अभियानाद्वारे विविध बँकेसोबत सामंज्यस्य करार करण्यात आला आहे.

रिजर्व बँक ऑफ इंडिया मार्गदर्शिका दि. २० जुलै २०२२ (FIDD.GSSD.CO.BC.No 09/09.01.003/2022-23)

कर्ज स्वरूप

कर्ज रक्कम

व्याजदर

प्रथम कर्ज

रु. १.५० लक्ष

७%

द्वितीय कर्ज

रु. ३.०० लक्ष

७%

तृतीय कर्ज

रु ३.०० ते ५.०० लक्ष

कमाल १० %

स्वयंसहाय्यता समूहांना बँक कर्ज प्राप्त होण्याकरिता अपेक्षित सहकार्य करण्याकरिता बँक शाखास्तरावर बँक सखी कार्यरत असते. सदर बँक सखी स्वयंसहाय्यता समूह व बँक यांच्यामध्ये दुवा म्हणून कार्य करते.

CBRM समिती (समुदाय स्तरीय वसुली यंत्रणा) – स्वयंसहाय्यता समूहांनी घेतलेल्या बँक कर्जाची नियमित परतफेड व्हावी व थकीत कर्ज वसुली करणे याकरिता प्रत्येक बँक शाखा स्तरावर CBRM (समुदाय स्तरीय वसुली यंत्रणा) समिती स्थापित करण्यात येते.

वैयक्तिक उद्योग व्यवसाय कर्ज

लखपती दिदी संकल्पनेच्या आधारित स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांना वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरिता बँकेच्या विविध योजना व जिल्हा उद्योग केंद्राच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती (CMEGP) व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेतर्गत (PMEGP) बँक कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. स्वयंसहाय्यता समुहातील सदस्यांना वैयक्तिक उद्योग व्यवसायाकरिता बँक कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता बँकांनी बँकनिहाय विशेष कर्ज योजना तयार केली आहे. आर्थिक साक्षरता स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांना आर्थिक नियोजन, योग्य बचत, समंजस खर्च, सुज्ञ कर्ज व सामाजिक सुरक्षा योजनाचा लाभ याबाबत आर्थिक साक्षरता सखी द्वारे गाव स्तरावर आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण दिले जाते. सदर प्रशिक्षण हे खेळ, तक्ते इ. माध्यमातून खालील विषयावर गावस्तरावर देण्यात येतात.

१. आर्थिक नियोजन – एकूण उत्पन्न – खर्च = बचत

२. समंजस खर्च – आवश्यक व अनावश्यक खर्च

३. स्मार्ट सुरेख बचत – बँकेमध्ये सुरक्षित बचत

४. सुज्ञ कर्ज – बँके द्वारे कर्ज

५. विमा संरक्षण व निवृत्ती वेतन – प्रधानमंत्री जीवन ज्योती, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व   

    अटल पेन्शन योजना

सक्षम केंद्र

प्रभागसंघ स्तरावर स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांना आर्थिक साक्षरतेविषयी मार्गदर्शन करण्याकरिता सक्षम केद्र स्थापित करण्यात येतात.

सामाजिक सुरक्षा योजना

स्वयं सहाय्यता समूहातील सदस्यांना जोखीम व्याप्ती प्राप्त व्हावी याकरिता प्रधानमंत्री जीवन ज्योती (PMJJBY) व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये (PMSBY) समाविष्ट करण्यात येते. सदर योजनेंतर्गत नैसर्गिक व अपघाती मृत्यू झाल्यास रु २ लक्षाचा विमा नामांकित व्यक्तीला प्राप्त होतो. त्याचप्रमाणे ग्रामीण महिलांना व त्यांच्या कुटुंबाला वृद्धापकालीन आर्थिक तरतुदीच्या अनुषंगाने अटल पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येते.

श्री.गंगाधर राऊत

तालुका व्यवस्थापक,उमेद
(महिला बचत गट)

Scroll to Top