मुदखेड पंचायत समिती

तालुका एक दृष्टिक्षेप

भौगोलिक माहिती :-

नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुका हा सन २००२ या वर्षात निर्माण झालेला असून सद्यस्थितीत  नांदेड लोकसभा व भोकर विधानसभा  क्षेत्रात अस्तित्वात आहे. तालुक्यात  बारड व मुगट असे दोन जिल्हा परिषद गट आणि  बारड, निवघा, मुगट, माळकौठा असे चार पंचायत समिती गण आहेत .

 तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ 33706 हे. असून, सरासरी पर्जन्यमान  829.20 mm. आहे .

  • तालुक्यातून गोदावरी आणि सीता नदी वाहते,सोबतच ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून कालव्या द्वारे   सिंचन सुविधा उपलब्ध आहे, केळी ऊस,फळबागा,आणि विशेषत: फुलशेती साठी प्रसिद्ध आहे .
  • तालुक्यातून लोहमार्ग जात असल्याने दळणवळणाच्या सोयी मुबलक प्रमाणात असुन तालुका बारमाही रस्त्यांनी जोडला गेला असून रस्त्याचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पुरेशा प्रमाणात आहेत . 
  • पर्यटन व धार्मिक स्थळाबाबत माहिती :-
  • बारड येथे शीतला देवीचे प्राचीन मंदिर असून येथे भाविक मोठया प्रमाणात दर्शनासाठी येतात. शीतला देवी स्वच्छता आणि आरोग्याची देवी आहे अशी मान्यता आहे, याठिकाणी दरवर्षी चैत्र आणि आषाढ महिन्यात मोठी यात्रा भरते.
  • शंखतीर्थ येथे नृसिंह मंदिर गोदावरी तीरावर हेमाडपंथी शैलीचे दगडी बांधकाम असुन मंदिर सुमारे तेराव्या शतकातील असल्याचे जाणकारांचे मत आहे. मंदिरातील नक्षीदार स्तंभावर उलटे नागशिल्प कोरलेले आहे. हे बदामीच्या चालुक्य राजघराण्याचे राजचिन्ह असल्याने हे मंदिर चालुक्य काळातील असल्याचे  सिद्ध होते.   
  • मुगट परिसरात ऐतिहासिक गुरुद्वारा माता साहेब देवाजी असून याठिकाणी शीख भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येतात,याठिकाणी भाविकांसाठी पूर्णवेळ लगरचे आयोजन असते.
  • आमदुरा येथे गोदावरी नदी काठा जवळील लहान टेकडीवर शिकारघाट साहिब गुरुद्वारा असून एक सुंदर वास्तुकला आहे .श्री गुरुगोविंद सिंगजी शिकारीनंतर येथे आले आणि सश्याला मारले  आणि आपल्या बाणाच्या स्पर्शानी त्याला मुक्त केले अशी धारणा आहे.

कार्यालयाची रचना

गट विकास अधिकारी
सहाय्यक गट विकास अधिकारी

सामान्य प्रशासन विभाग

सहाय्यक प्रशासन अधिकारी
कनिष्ठ प्रशासन अधिकारी
वरिष्ठ सहाय्यक
कनिष्ठ सहाय्यक
वाहन चालक
परीचर

वित्त विभाग

सहाय्यक लेखा अधिकारी
कनिष्ठ लेखा अधिकारी
वरिष्ठ सहाय्यक

पंचायत विभाग

विस्तार अधिकारी (पंचायत)
विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
ग्रामपंचायत अधिकारी

आरोग्य विभाग

तालुका आरोग्य अधिकारी
वैद्यकीय अधिकारी
विस्तार अधिकारी (आरोग्य)
औषध निर्माण अधिकारी
सामुदाय आरोग्य अधिकारी
आरोग्य सहाय्यिका
आरोग्य सहाय्यक
आरोग्य सेविका
आरोग्य सेवक

शिक्षण विभाग

गट शिक्षण अधिकारी
विस्तार अधिकारी (शिक्षण)
केंद्र प्रमुख
मुख्याध्यापक
माध्यमिक शिक्षक
प्राथमिक शिक्षक

उपविभाग बांधकाम
उपविभाग पाणी पुरवठा
उपविभाग लघु पाटबंधारे

उपअभियंता
शाखा अभियंता
कनिष्ठ अभियंता
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक

कृषी विभाग

कृषी अधिकारी
विस्तार अधिकारी

पशुसंवर्धन

पशुधन विकास अधिकारी
पशुधन पर्यवेक्षक
पट्टी बंधक

महिला व बाल कल्याण

बाल विकास प्रकल्प अधिकारी
विस्तार अधिकारी (सां)
पर्यवेक्षिका
अंगणवाडी सेविका
अंगणवाडी मदतनीस

पंचायत समितीची रचना

पंचायत समिती ही ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्य करणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.
या समितीत विविध सदस्य आणि अधिकारी असतात.
यामध्ये सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी आणि निवडून आलेले सदस्य असतात.
पंचायत समितीचे मुख्य उद्दिष्ट गावांच्या विकास योजनांची अंमलबजावणी करणे आहे.
ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद यांच्यामधील दुवा म्हणून पंचायत समिती काम करते.
विविध सरकारी योजना गावांपर्यंत पोहोचवण्याचे कामही ही संस्था करते.
शिक्षण, आरोग्य, शेती, पाणीपुरवठा यासारख्या क्षेत्रात काम केले जाते.

कार्ये

पंचायत समितीचे मुख्य कार्य ग्रामीण विकास साधणे आहे.
सरकारी योजना गावांमध्ये राबवण्याचे काम करते.
शेती, पशुसंवर्धन आणि लघुउद्योगांना प्रोत्साहन देते.
गावांमध्ये पाणीपुरवठा आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देते.
शिक्षण आणि आरोग्य सेवांचा विकास करते.
ग्रामीण रस्ते आणि इतर मूलभूत सुविधा उभारते.
गरजू लोकांसाठी कल्याणकारी योजना राबवते.
ग्रामपंचायतींचे कामकाज समन्वयित करते.

पंचायत समितीचा कार्यकाल

पंचायत समितीचा कार्यकाल सामान्यतः पाच वर्षांचा असतो.
निवडणुकांद्वारे सदस्य निवडले जातात.
निवडणुकीनंतर सभापती आणि उपसभापती निवडले जातात.
या काळात पंचायत समिती विविध विकास कामे करते.
कार्यकाल संपल्यानंतर पुन्हा निवडणुका घेतल्या जातात.
नवीन सदस्य आणि पदाधिकारी निवडले जातात.
कार्यकालादरम्यान नियमित बैठका घेतल्या जातात.
यामध्ये विकास योजना मंजूर केल्या जातात.
लोकांच्या समस्यांवर चर्चा केली जाते.
पंचायत समितीची कामे कायद्याने नियंत्रीत असतात.

सभापती

सभापती हा पंचायत समितीचा प्रमुख पदाधिकारी असतो. पंचायत समितीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणे आणि समितीच्या कामकाजावर देखरेख करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी असते. विकास योजनांबाबत निर्णय घेणे आणि सदस्यांमध्ये समन्वय साधणे हेही सभापतीचे महत्त्वाचे कार्य असते.

अविश्वास ठराव

अविश्वास ठराव म्हणजे एखाद्या पदाधिकाऱ्यावर विश्वास नसल्याचे सदस्यांनी मांडलेले प्रस्ताव. पंचायत समितीतील सदस्य सभापती किंवा उपसभापती यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडू शकतात. बहुमताने ठराव मंजूर झाल्यास संबंधित पदाधिकारी पदावर राहू शकत नाही.

Scroll to Top